नांदगावला अमावस्येलाही होणार कांद्याचे लिलाव

नांदगावला अमावस्येलाही होणार कांद्याचे लिलाव

नांदगाव । प्रतिनिधी

अमावस्येच्या दिवशीदेखील बाजार समितीच्या आवारात शेतकर्‍यांनी कांदा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन नांदगाव बाजार समिती सभापती तेज कवडे यांनी केले आहे.

अमावस्या म्हणजे केवळ अशुभ आणि अशुभच असा सर्वसामान्यांचा समज शुभकार्याचा विचारही या तिथीला अक्षम्य असला तरी पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारसरणीला न पटणार्‍या या गोष्टीला फाटा देत नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ आणि व्यापारी यांच्या बैठकीत शुक्रवार (दि. 9) रोजी असलेल्या अमावस्येला लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती सभापती तेज कवडे यांनी दिली.

जिल्ह्यातील अनेक बाजार समित्या कांद्यासाठी प्रसिद्ध आहे त्यांपैकी असलेली नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती. या बाजार समितीत अमावस्येच्या दिवशीही कांद्याचे लिलाव सुरू होते. परंतु दोन वर्षापूर्वी अमावस्येच्या दिवशी कांद्याचे लिलाव खंडित करण्यात आले होते. परंतु अमावस्येच्या दिवशीही आता कांद्याचे लिलाव सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय संचालक मंडळ व व्यापारी वर्गातर्फे एकमताने घेण्यात आला आहे.

नांदगाव बाजार समितीच्या स्थापनेपासून अमावस्येच्या दिवशी देखील कांद्याचे लिलाव नियमितपणे सुरू होते. मात्र गेल्या दोन वर्षीपुर्वी अमावस्येच्या दिवशी कांद्याचे लिलाव खंडित करण्यात आले होते. या प्रचलित परंपरेला आता फाटा देत दर अमावस्येला सकाळच्या सत्रात कांद्याचे लिलाव सुरू करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com