दीपावलीनंतर कांदा लिलावास आरंभ

दीपावलीनंतर कांदा लिलावास आरंभ

पिंपळगाव बसवंत । प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) मुख्य आवारात दीपावलीनंतर (diwali) कांदा (onion) या शेतीमालाचे लिलावाचे (Auction) कामकाज बाजार समिती सभापती आमदार दिलीप बनकर (Market Committee Chairman MLA Dilip Bankar) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

लिलावाच्या दिवशी सकाळचे 560 वाहनांमधून कांदा (onion) विक्रीस आला होता. यावेळी कमीत कमी 1,200 रु., जास्तीत जास्त 3,755 रु. तर सरासरी 2350 रुपये कांद्यास प्रति क्विंटल भाव मिळाला. यावेळी विक्रीसाठी आलेल्या पहिल्या शेतीमाल उत्पादकाची (farmers) बाजार समिती सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच गेल्या आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 31 या कालावधीत जास्तीत जास्त शेतमाल खरेदी केलेल्या पहिल्या तीन व्यापार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

त्यात एच.के. मार्केटिंगचे हरीष खटाव ठक्कर, शंकरलाल भानजी ठक्कर, सोहनलाल मोहनलाल भंडारी या व्यापार्‍यांचाही आ. बनकरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रोख चुकवती, चोख वजनमाप यामुळे येथील आवारावर शेतमालाची आवक वाढत असल्याचे आमदार बनकर यांनी म्हटले आहे. बाजार समितीने शेतकरी, व्यापारी, हमाल, मापारी व मार्केट घटकांसाठी 55 कोटी इतक्या रक्कमेच्या सोयीसुविधा दिल्या आहे.

कांदा उत्पादकांचे (Onion growers) नुकसान होवू नये यासाठी दोन शेड उभारले आहे. सौर ऊर्जा प्रकल्प (Solar Power Project) उभारणारी देशातील ही पहिली बाजार समिती आहे. तसेच शेतकर्‍यांसाठी शेतकरी भवन उभारले आहे. येथे विक्रीसाठी येणार्‍या टोमॅटो (tomato) या शेतीमालाचे ग्रेडींग, पॅकींग साठी 50 कोटी रकमेचे शेड उभारणी करावयाची आहे. त्याची सर्व प्रक्रीया पुर्ण झाली असून लवकरच हे काम पुर्ण होईल असेही आ. बनकर म्हणाले.

याप्रसंगी बाजार समितीचे संचालक सोहनलाल भंडारी, विजय बाफणा, महाविर भंडारी, दिनेश बागरेचा, अतुल शहा, प्रवीण मोरे, सतीश मोरे, विलास निळकंठ, महेश कलंत्री, संकेत पारख, बाबा लक्ष्मण आहेर, प्रवीण कागदे, सचिन बनकर, नारायण पोटे आदींनी बाजार समिती प्रशासकीय व लिलावाच्या कामकाजाबद्दल मनोगतातून कौतुक करुन सभापती, संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com