लासलगावला आजपासून कांदा लिलाव सुरु

लासलगावला आजपासून कांदा लिलाव सुरु

लासलगाव । Lasalgoan

लासलगाव बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर आज (दि.26) पासून कांदा व शेतमाल भुसार, धान्य लिलाव सुरू करण्यात येत असल्याचे बाजार समिती सभापति सुवर्णा जगताप, उपसभापती प्रिती बोरगुडे, सचिव नरेंद्र वाढवणे यांनी म्हटले आहे.

वाढत्या करोना संसर्गाला आळा बसावा यासाठी लासलगाव बाजार समितीने गेली काही दिवस कांदा व शेतमाल लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. जेणेकरून बाजार आवारावर येणारे शेतकरी, व्यापारी, हमाल, माथाडी व सेवक यांचा करोना संसर्गापासून बचाव व्हावा. तसेच लासलगाव परिसरात करोना संसर्गाची वाढती साखळी तुटावी यासाठी बाजार समिती प्रशासनाने कांदा व भुसार शेतमाल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु आता तालुक्यासह जिल्हाभरात उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून शेतकर्‍यांना खरिप हंगामातील पीके उभी करण्यासाठी पैशांची गरज आहे. तसेच अनेक शेतकर्‍यांकडे कांदा साठविण्याची कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्याचे दिवस विचारात घेता शेतकर्‍यांचा कांदा ओला होऊ नये.

तसेच शेतकर्‍यांची थांबलेली आर्थिक उलाढाल पुन्हा सुरळीत व्हावी यासाठी बाजार समितीने कांदा व भुसार शेतमाल लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला असून शेतकर्‍यांनी शेतमाल विक्रीसाठी लासलगाव बाजार आवारावर आणावा असे आवाहन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com