सटाणा, उमराणेत उद्यापासून कांदा लिलाव

सटाणा, उमराणेत उद्यापासून कांदा लिलाव

एक दिवसआधी नोंदणी करणे आवश्यक

सटाणा/उमराणे । वार्ताहर

सटाणा ( ता प्र ) सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे दि. 24 मे पासून सुरु करण्यात आलेल्या लिलावात सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांच्या निर्देशानुसार शेतकरी बांधवांतर्फे एक दिवस आधी मोबाईलवर नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सभापती संजय देवरे, उपसभापती मधुकर देवरे व सचिव भास्कर तांबे यांनी सांगितले.

रोज सकाळी साडेनऊ वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत 7387299511 व 7387299518 या मोबाईल क्रमांकावर एका वेळी 500 ट्रॅक्टर कांदा लिलावासाठी नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी झालेल्या वाहनांना दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजेपासून सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत बाजार समिती आवारात प्रवेश देतांना, शेतकर्‍यांना कृउबा तर्फे मोबाईलवर देण्यात आलेला संदेश दाखविणे आवश्यक आहे. वाहनासोबत येणार्‍या व्यक्तीने किमान सात दिवस आधी केलेला कोरोना चाचणी निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.

कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी शेतकरी-व्यापारी व इतर घटकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतरासारख्या उपाय योजनांबत दक्षता घ्यावी. सद्यस्थितीत पिकअप, रिक्षा आदी वाहनांचा लिलाव बंद आहे. शनिवारी नोंदणी करण्यात आलेल्या वाहनांना सोमवारी सकाळी सहा वाजता प्रवेश देण्यात येणार असल्याचे संबधित सूत्रांनी सांगितले.

उद्या उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव सुरू होणार आहेत. 12 दिवसांनंतर सुरू होणार असल्याने शेतकरी बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणे येथे जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक साहेब यांचे आदेशान्वयेे समितीचे कामकाज व कांदा भुसार माल लिलाव सोमवारी (दि. 24 )सुरू होणार असल्याची माहिती मुख्य प्रशासक सोनाली विलास देवरे यांनी दिली आहे. शेतीमाल घेऊन येणार्‍या फक्त पाचशे वाहनांचा लिलाव दररोज करण्यात येईल.

कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करून लिलावाचे कामकाज सुरू होत आहे. बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येणार्‍या शेतकरी बांधवांनी मागील सहा दिवसांपूर्वीचा करोना निगेटिव्हचा दाखला घेऊन येणे अनिवार्य राहील. तसेच बुकिंग केलेनुसार आपल्या मोबाईलवरचा संदेश मेसेज दाखवल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. करोना विषाणू आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाजार आवारात खालील दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन करून बुकिंग केलेल्या वाहनांचा लिलाव होणार आहे. रोज बुकींग केलेल्या पहिल्या पाचशे वाहनांचा लिलाव करण्यात येईल. मो. नंबर 8888735449 व 8888732549 या नंबर आपली कॉल करून आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सचिव नितीन जाधव, उपसचिव गायकवाड यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com