दीपावली सणानिमित्त कांदा लिलाव बंद

दीपावली सणानिमित्त कांदा लिलाव बंद

लासलगाव। प्रतिनिधी Lasalgaon

लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनच्या Onion Traders Association पत्रावरून व्यापारी वर्गाचे मजूर दीपावली सणानिमित्त Diwali Festival बाहेरगावी जाणार असल्याने शुक्रवार दि.29 ऑक्टोबर पासून ते बुधवार दि.10 नोव्हेंबर पर्यंत लासलगाव बाजार समितीच्या Lasalgaon APMC मुख्य व उपबाजार आवारावर कांदा लिलाव बंद राहतील.

तसेच गुरुवार दि.11 नोव्हेंबर पासून कांदा लिलाव नियमित सुरू राहतील. कांदा व धान्य भुसार तेलबिया शेतीमालाची चुकवती रक्कम शेतकर्‍यांनी रोख स्वरूपात घ्यावी. कोणत्याही शेतकरी बांधवांनी जमा पावती अथवा चेक घेऊ नये.

काही तक्रार असल्यास लासलगाव बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.