ढगाळ हवामानामुळे कांदा, द्राक्ष उत्पादक धास्तावले

ढगाळ हवामानामुळे कांदा, द्राक्ष उत्पादक धास्तावले

Onion and grape growers worried due to cloudy weather

करंजीखुर्द। वार्ताहर Kranji Khurd

गेल्या दोन दिवसांपासून सततच्या ढगाळ हवामानामुळे cloudy weather द्राक्षे Grapes , कांदा Onion , भाजीपाला आदी पिकांवर रोगाचा प्रादूर्भाव वाढू लागल्याने उत्पादनात घट होण्याचे संकेत मिळू लागले आहे.

साहजिकच दोन वर्ष करोनाचा प्रादूर्भाव त्यानंतर परतीच्या पावसाने घातलेले थैमान अन् आता ढगाळ हवामान यामुळे शेतकर्‍याचे आर्थिक चक्र कोलमडून पडल्याने व आताच्या ढगाळ हवामानामुळे उत्पादनात देखील घट होण्याचे संकेत मिळू लागल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सध्या तालुक्यात कांदा लागवडीचा हंगाम ऐन बहरात आला आहे. शेतकर्‍यांनी महागडी बियाणे घेवून कांदा रोपे तयार केली. ही रोपे तयार करतांनाही परतीच्या पावसामुळे रोपांवर परिणाम होऊन उगवण कमी प्रमाणात झाली तर अनेक ठिकाणी रोपांची वाढ खुंटली. तसेच रोपे पिवळी पडण्याचे प्रमाण वाढले. त्यातच आता ढगाळ वातावरण सुरू झाल्याने कांदा, द्राक्षे, भाजीपाला पिकांवर मावा, बुरशीचा प्रादूर्भाव वाढू लागला आहे.

दोन वर्ष करोनामुळे हातात आलेले पीक विक्री करता आले नाही. तर यावर्षीचा खरीप हंगाम अतिपावसामुळे वाया गेला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या सर्व अपेक्षा रब्बी पिकावरच केंद्रीत झाल्या असतांनाच आताचे ढगाळ हवामान कांदा, भाजीपाला, द्राक्षे पिकासाठी हानीकारक ठरू लागले आहे. कांदा लागवडीसाठी महिला मजूर वर्गाची डोकेदुखी ठरत असतांनाच खते, बियाणे, औषधे यांचे वाढलेले बाजारभाव अन् ऐनवेळी नैसर्गिक आपत्तीचा करावा लागणारा सामना यामुळे शेतीव्यवसाय तोट्याकडे वाटचाल करीत असतांना शेतकर्‍यांच्या अडचणींमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे.

मागील वर्षी शेतकर्‍यांनी पिकविलेला उन्हाळ कांदा चाळीत साठवून ठेवल्याने त्यास बर्‍यापैकी भाव मिळाले. मात्र सरते शेवटी कांदा भावाने देखील वांधा केला. मात्र आता तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर उन्हाळ कांदा लागवड होण्याचे संकेत मिळू लागल्याने पुढे भाव मिळेल की नाही याची भिती देखील सतावत आहे. कारण आवक वाढते तेव्हा भाव पडतात हा निसर्ग नियम आहे.

मात्र असे असतांनाही शेतकरी पुढे भाव मिळेल या आशेवर कांदा लागवड करण्यात व्यस्त आहे. मात्र आत्ताचे ढगाळ हवामान त्यास त्रासदायक ठरू लागले आहे. ढगाळ हवामानाचा सर्वाधिक फटका द्राक्षपिकाला बसत असून शेतकरी रात्रीचा दिवस करून द्राक्षबागेत औषध फवारणी करून पीक वाचविण्याला तालुक्यातील शेतकरी प्राधान्य देवू लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com