वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू

वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू

निफाड | Niphad

तालुक्यातील शिवडी (Shivdi) येथील मंगला भाऊसाहेब क्षीरसागर (४५) (Mangala Kshirsagar) या विवाहितेच्या अंगावर वीज (Lightning) पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवडी येथील भाऊसाहेब पुर्णाजी क्षीरसागर हे त्यांची पत्नी मंगला भाऊसाहेब क्षीरसागर यांच्यासह काल गुरूवारी (दि.७) दुपारी आपल्या शेतात टोमॅटो काढण्यासाठी गेले होते.

दुपारी चारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस (Heavy Rain) पडू लागल्याने त्यांनी एका झाडाचा आसरा घेतला. याचवेळी वीज कोसळल्याने मंगला क्षीरसागर यांचा मृत्यू झाला.

उगाव येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. निफाड पोलिस ठाण्यात (Niphad Police Station) या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उगावच्या तलाठी फाकटकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबतचा अहवाल निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांना सादर केला आहे.

शिवडी अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com