नाशकात सरासरी नऊ तासांत एक वाहनचोरी

पोलीस प्रशासनाचे फक्त समुपदेशनाकडे लक्ष?
नाशकात सरासरी नऊ तासांत एक वाहनचोरी
USER

नाशिक । वैभव कातकाडे Nashik

नोव्हेंबर महिन्यात एकीकडे दिवाळी सण Diwali Festival साजरा होत असतानाच वाहनचोरांनी vehicle theft शहरातील वाहने चोरून दिवाळी साजरी केली असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

दैनंदिन गुन्हे अहवालातून नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात एकूण 42 वाहनांची चोरी झाल्याचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत नोंदवण्यात आले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या 16 दिवसांत वाहन चोरीला गेले असून सरासरी नऊ तासाला एक वाहन शहरात चोरीला जात आहे. पोलीस प्रशासनाचे Police Administration फक्त समुपदेशन आणि हेल्मेटसक्तीकडेच लक्ष आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी कमी होत गेला तशा बाजारपेठा सुरू करण्यात आल्या. याच काळात वाहनचोरट्यांनीदेखील आपला कार्यभाग साधण्यास सुरुवात केली. त्यातच आलेल्या दसरा, दिवाळी या सणांनिमित्त बाजारपेठेत होणार्‍या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी नागरिकांची वाहने लांबवली. शहरातील 11 पोलीस ठाण्यांत 42 वाहनचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या 16 दिवसांत वाहन चोरीला गेले असून सरासरी नऊ तासाला एक वाहन शहरात चोरीला जात आहे.

पोलिसांनी शहरात 15 ऑगस्टपासून हेल्मेटसक्ती करण्यासाठी विविध मोहिमा सुरू केल्या आहेत. नो हेल्मेट, नो पेट्रोल, विनाहेल्मेट वाहनचालकांचे समुपदेशन, नो हेल्मेट, नो सहकार्य त्यातच भरीस भर म्हणजे आता समुपदेशनअंती परीक्षा पास झाल्याशिवाय वाहन मिळणार नाही. पोलिसांच्या या मोहिमांचे एका बाजूला कौतुक होत असले तरी शहरातील वाढत्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांची आकडेवारी लपवता येत नाही.

हेल्मेट प्रबोधन सुरक्षा भिंत

शहरात जनतेची काळजी म्हणून हेल्मेट वापरण्यासाठी विविध पद्धतीने प्रबोधन करणे हे एकादृष्टीने उत्तम असले तरी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात 42 दुचाकी चोरीला जाणे आणि पोलीस प्रशासन फक्त हेल्मेट प्रबोधन करत राहणे हे संयुक्तिक ठरत नाही. हेल्मेट प्रबोधन ही एका अर्थाने पोलिसांसाठी सुरक्षा भिंत असल्याचे बोलले जात आहे.

विविध पोलीस ठाण्यांत वाहनचोरीबाबत गुन्हे

भद्रकाली 8 मुंबईनाका 6 नाशिकरोड आणि सरकारवाडा प्रत्येकी 5 इंदिरानगर आणि पंचवटी प्रत्येकी 4 म्हसरूळ 3 अंबड, आडगाव आणि उपनगर प्रत्येकी 2 गंगापूर 1 एकूण 42

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com