जिल्ह्यासाठी एक हजार रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध

खा. डॉ. भारती पवार यांची माहिती
जिल्ह्यासाठी एक हजार रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध

नाशिक । Nashik

जिल्ह्यातील कोव्हीड रूग्णालयांसाठी एक हजार रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण करत बंगलोर येथून हे इंजेक्शन नाशिक येथे दाखल झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यातून मागणी केलेल्या कोव्हीड रुग्णालयांना त्यांच्या रुग्ण संख्येनुसार हे रेमडीसीवर दिले जाणार आहे, अशी माहिती खा. डॉ भारती पवार यांनी दिली.

करोना संकटाचे थैमान सुरू असतांना कोव्हीड रुग्णांची वाढलेली अमर्याद संख्या यामुळे भूतो न भविष्यती अतिशय घातक अशी परिस्थिती नाशिक जिल्ह्यात निर्माण झाली आहे. रात्रंदिवस रुग्णांच्या नातेवाईकांनी खा. डॉ भारती पवारांना आपल्या आर्त आवाजात केलेली मदत याचना.

अतिशय मन हेलवणारे संभाषण 'रुग्णांची गंभीर अवस्था त्यातच त्यांना वेळेवर न मिळणारा बेड ,त्यांना लागणारा ऑक्सीजनचा तुटवडा तसेच रेमडीसीवर हे लागणारे इंजेक्शन आणि अशी परिस्थिती असतांना ही रेमडीसीवर इंजेक्शन कशी उपलब्ध होतील.ह्याच विवंचनेत असतांना रेमडीसीवर उत्पादित करणाऱ्या अनेक कंपन्यांशी खा .डॉ भारती पवारांनी संभाषण करत हे इंजेक्शन नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठी कसे उपलब्ध करता येईल ह्याकडे लक्ष केंद्रित केले .

त्याच बरोबर केंद्राच्या आरोग्यविभागाकडे ही सातत्याने याचा पाठपुरावा करत होत्या .गुजरात, कर्नाटक येथील उत्पादकांशी चर्चा करून शेवटी बंगलोर येथील मायलान कंपनीचे नरेश जी हसीजा यांनी खा. डॉ भारती पवार यांच्या विनंतीला मान देऊन एक हजार इंजेक्शन हे नाशिक जिल्ह्यातील कोव्हीड रूग्णालयांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

त्याची प्रक्रिया पूर्ण करत बंगलोर येथून हे इंजेक्शन नासिक येथे दाखल झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयातून नाशिक जिल्ह्यातून मागणी केलेल्या कोव्हीड रुग्णालयांना त्यांच्या पेशंटच्या संख्येनुसार हे रेमडीसीवर दिले जाणार असल्याचे खा. डॉ भारती पवार यांनी सांगितले आहे.

अशा कठीण परिस्थितीत केंद्र सरकारची मदत व जिल्हाधिकारी तथा त्यांच्या टीम ने करून घेतलेले योग्य नियोजन केले. तसेच रेमडीसीवर लवकरात लवकर नाशिकला उपलब्ध होण्यासाठी एफडीए चे सह संचालक भामरे यांच्याशी हा गंभीर विषय अवगत करून रेमडीसीवर इंजेक्शन करोना बाधित रुग्णांना उपलब्ध व्हावे म्हणून केलेली चर्चा आणि याचाच परिणाम म्हणून आज हे एक हजार रेमडीसीवर इंजेक्शन खा.डॉ भारती पवार यांनी नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध करून जिल्हाधिकारी मांढरे यांचेकडे सुपूर्द केले.मायलॉन कंपनीचे नरेश हसिजा यांचे विशेष आभार मानले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com