उमराणे खून प्रकरणी बारा तासात संशयित गजाआड

उमराणे खून प्रकरणी बारा तासात संशयित गजाआड

देवळा | योगिता पवार

देवळा तालुक्यातील उमराणे येथे शेतात राहणाऱ्या पंडित सखाराम देवरे या ६७ वर्षीय वृद्धाचा निर्घृणपणे खून करून मृतदेह शेतातील झुडुपांमध्ये फेकून देणाऱ्या संशयित आरोपीला देवळा पोलिसांनी १२ तासांच्या आत अटक केली.

शेतजमीन आपल्याला मिळावी या उद्देशाने खून केल्याची कबुली संशयित आरोपींने दिली आहे. आरोपी हा मयत पंडित देवरे यांच्या भाच्याचा मुलगा म्हणजेच त्यांचा नातू असून शुभम जाधव रा. राजधीर ता. चांदवड वय वर्ष २० असे त्याचे नाव आहे.

पंडित सखाराम देवरे यांचा विवाह झालेला नसून त्यांना तीन बहिणी आहेत. त्यापैकी दोन अविवाहित बहिणी आणि ते असे तिघे उमराने येथे त्यांच्या शेतात राहतात. शेतजमीनीवर ते आपला उदरनिर्वाह करत.

रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने धारधार हत्याराने चेहऱ्यावर, डोक्यावर, गळ्यावर वार करून जीवे ठार मारले त्यानंतर त्यांचा मृतदेह शेततळ्याजवळ झुडुपांमध्ये फेकून दिला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत श्वान पथकाद्वारे संपूर्ण परिसराची पाहणी करून आरोपीचा मागोवा घेतला. यावेळी घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी भेट देत पाहणी केली.

पोलिसांनी अनेक दृष्टीने तपासाची चक्रे फिरवल्यानंतर जमिनीच्या वादातून हा खून झाला असल्याचा संशय आल्याने संशयितांची कसून चौकशी केलेल्यानंतर जमीन आपल्याला मिळावी या उद्देशाने मयताच्या भाच्याच्या मुलाने म्हणजेच नातवानेच हा खून केल्याचे उघडकीस आले.

अवघ्या १२ तासांच्या आत आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर, खंडेराव भवर आदी करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com