लग्नात नाचताना झाले भांडण; युवकावर कोयत्याने वार

लग्नात नाचताना झाले भांडण; युवकावर कोयत्याने वार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लग्नात नाचताना धक्का लागला म्हणून युवकाच्या पोटात कोयत्याने वार करून गंभीर जखमी (Injured) करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिखरेवाडी मैदानाजवळ (Shikharewadi Ground) घडली...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योती राहुल चाफळकर (Jyoti Chafalkar) (रा. साने गुरूजी नगर, महाजन हॉस्पिटलमागे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, किरण चाफळकर (Kiran Chafalkar) यांच्या जावयाच्या मुलाचे लग्न होते. लग्नात बोलवलेले नसतानाही विशाल चाफळकर, अजय चाफळकर हे येऊन नाचत होते.

नाचताना धक्का लागल्यावरून भांडण झाले. यावेळी विशाल व अजय चाफळकर यांना लग्नाच्या स्थळावरून काढून देण्यात आले. दरम्यान, राहुल बाबूलाल चाफळकर (32) हा शिखरेवाडी क्रीडांगणाच्या बाहेरून रस्तावरून जात होता. विशाल व अजय चाफळकर यांनी लग्नातील वादाची कुरापत काढत राहुलच्या पोट्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी दुसरी फिर्यादही दाखल करण्यात आली आहे. पुष्पा विजय चाफळकर (साने गुरूजी नगर येथील) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शिवाजी पुतळ्याजवळ राहूल बाबूलाल चाफळकर, नितीन अनिल पुसळकर, प्रविण दिलीप पुसळकर (रा. साने गुरूजी नगर) यांनी कारण नसताना शिवीगाळ करून डोक्यात काहीतरी मारून दुखापत केली. उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com