ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
अपघात

नाशिक रोड

सामनगाव रोडवर असलेल्या मानकर वस्तीजवळ चाडेगाव शिवार येथे ट्रॅक्टरची धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकी गाडी चालक ठार झाला. या अपघातात ट्रॅक्टर वर काम करणारा मजूर सुद्धा जखमी झाला आहे. ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे.

सामनगाव रोडवर असलेल्या मानकर वस्ती येथील चाडेगाव शिवारात ट्रॅक्टर चालक माधव सागर (राहणार रामाचे पिंपळस तालुका निफाड) हा आपल्या ताब्यात असलेल्या ट्रॅक्टर (एम एच 15 एच एस सी 53 73) भरधाव वेगाने चालवत होता. यावेळी दुचाकी (क्रमांक एम एच 15 डी डब्ल्यू 84 43) या गाडीवरून तुषार वाल्मीक नवले (40 राहणार आवारे मळा,नाशिक रोड) हा युवक जात असताना त्याला ट्रॅक्टरची धडक लागली. त्यात तो जागीच कोसळून मरण पावला. या घटनेत ट्रॅक्टरवर असलेला मजूर बाळू गोरख साबळे हा स्वतः जखमी झाला आहे. या अपघात प्रकरणी योगेश वाल्मीक नवले यांनी फिर्याद दाखल केली असून या तक्रारीनुसार नाशिक रोड पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश नाय दे हे करत आहे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com