Nashik Accident News : एसटी-ट्रकचा भीषण अपघात; एक ठार, अनेक जखमी

Nashik Accident News : एसटी-ट्रकचा  
भीषण अपघात; एक ठार, अनेक जखमी

नाशिक | Nashik

येथील नाशिक-पेठ महामार्गावर ( Nashik-Peth Highway) एसटी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रकचा (ST Buses and Cement Mixer Trucks) भीषण अपघात (Terrible Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला असून दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत...

याबाबत अधिक माहिती अशी की, पेठ (Peth) आगारातून सुटलेली पेठ-नाशिक-पुणे-नाशिक बस क्रमांक (एम एच ४० वाय ५९७६) ही बस (Bus) पेठहून नाशिकमार्गे पुण्याच्या दिशेने जात होती. तर सिंमेट मिक्सर ट्रक हा नाशिककडून रामशेज आशेवाडी गावच्या (Ashewadi Village) दिशने जात होता.

Nashik Accident News : एसटी-ट्रकचा  
भीषण अपघात; एक ठार, अनेक जखमी
Nashik Crime News : गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर अत्याचार; संशयित ताब्यात

यावेळी दोन्ही वाहने भरधाव वेगात असल्याने त्यांची नाशिक महापालिकेच्या कमानीजवळ समोरासमोर धडक झाली. या धडकेत ट्रकचालक बाळू बेंडकुळे याचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर दहा प्रवासी जखमी झाले.

दरम्यान, त्यानंतर जखमींना पेठ-जुना आडगाव नाका (Peth-Juna Adgaon Naka) येथील रुग्णवाहिकेने तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यावेळी बसमधील इतर प्रवाशांना दुसऱ्या बसने नाशिककडे रवाना करण्यात आले. तर अपघातानंतर पेठ-महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर प्रशासन आणि नागरिकांनी मदतकार्य करत वाहतूक सुरळीत केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Nashik Accident News : एसटी-ट्रकचा  
भीषण अपघात; एक ठार, अनेक जखमी
त्र्यंबकेश्वर पोलिसांनी पकडला 'इतक्या' लाखांचा गुटखा
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com