
नाशिक | Nashik
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकरसंक्रातीच्या (Makar Sankranti) पार्श्वभूमीवर आत्तापासूनच तरुणाईला पतंग (Kite) उडवण्याचे वेध लागले आहेत...
यात प्लास्टिक, सिंथेटिकपासून बनवलेल्या काचेचा थर असणाऱ्या नायलॉन मांजाचा (Nylon Manja) सर्रास वापर केला जातो. त्यातून अनेकांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच आता नायलॉन मांजामुळे एक जण जखमी झाल्याची घटना चांदवड (Chandwad) येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोटारसायकलवरून जात असताना राजेश शिंदे (Rajesh Shinde) नामक व्यक्तीच्या गळ्यात मांजा अडकल्याने त्यांचा गळा (Throat) कापला. यामध्ये त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी प्रथम चांदवडच्या प्राथमिक रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले.
दरम्यान, त्यानंतर पुढील उपचारासाठी मालेगावच्या खासगी रुग्णालयात (Malegaon Private Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे.