महिलेच्या विनयभंगप्रकरणी एकास सश्रम कारावास

महिलेच्या विनयभंगप्रकरणी एकास सश्रम कारावास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बसमध्ये (Bus) बसत असतांना तेथे असलेल्या गर्दीचा फायदा घेवून एका महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग (Molestation) करणाऱ्याला न्यायालयाने (Court) एक वर्ष सश्रम कारावास (Hard Work Imprisonment) व १० हजार रुपये दंडाची शिक्षा (Punishment) सुनावली आहे...

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,८ मार्च २०१४ सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान बाफना हाउस गायकवाड नगर येथे आरोपी ईशाद राजमोहमंद मनियार (Ishad Rajmohmand Maniyar) (३२, रा. रंगमहाल, जुने कोर्ट गल्ली, ता. चांदवड, जि. नाशिक ) याने बसमध्ये बसत असतांना गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयाचा तपास उपनिरीक्षक अशोक पाथरे (Ashok Pathre) यांनी करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून, गुन्हा साबित होण्याच्या दृष्टीने तपास करून आरोपीविरुद्ध मुख्य न्यायदंडाधिकारी, नाशिक येथे दोषारोपपत्र (Indictment) दाखल केले होते, सदर खटल्याची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी, नाशिक येथे सुरू होती.

मुख्य न्यायदंडाधिकारी, नाशिक समीर जी. बावकर यांनी सदर गुन्हयातील आरोपीविरूध्द फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थिीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपी ईशाद मणियार याला एक वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

दरम्यान, या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून सलीम तडवी यांनी कामकाज पाहिले. तसेच कोर्ट अंमलदार म्हणून जी.ए. गायकवाड यांनी सदर गुन्हयात शिक्षा लागण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा केला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com