आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूर-अंबड लिंक रोडवर (Satpur-Ambad Link Road) भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने (Eicher truck) दुचाकीला (Two-wheeler) मागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश रामचंद्र पवार (Yogesh Ramchandra Pawar) हे मोटरसायकलवरून (क्र. एम. एच. १५ बीटी ३१६०) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास म्हाडाकडून सातपूर-अंबड लिंकरोडकडे येत असताना अंबिका संकुलजवळ (Ambika Sankul) त्यांच्या पाठीमागून येणारा आयशर (क्र. एम. एच. १५ एफव्ही ९८११) ओव्हरटेक करतना डाव्या बाजूने जाणाऱ्या मोटरसायकलला धडक दिली.

या अपघातात योगेश पवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी आयशर चालक सुधीर शिवाजी तवार (Sudhir Shivaji Tawar) (३०, रा. म्हाडा कॉलनी, आशीर्वादनगर, खंडेराव मंदिराजवळ, अंबड) यास अटक केली.

पुढील तपास वपोनी कुमार चौधरी (Kumar Chaudhary) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरिसिंग पावरा (Harisingh Pavara) करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com