कार अपघातात एक जण जागीच ठार

कार अपघातात एक जण जागीच ठार

ओझर | वार्ताहर ozar

येथील मुंबई आग्रा महामार्गावर(Mumbai- Agra Highway ) सावित्री हाँटेल समोर पिंपळगांव कडे जाणाऱ्या एका कारने डिव्हायडरला धडक देऊन पलटी घेत दुसर्या लेन मध्ये येऊन एका ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला.

रोहित अंकुश शिवणकर (वय 36) राहाणार मुळ सातारा हल्ली राहाणार पिंपळगांव हे त्यांच्या होंडा कारने ( एम एच. 15 एफ टी 8453) नाशिक कडून पिंपळगांव कडे जात असताना हाँटेल सावित्री समोर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकुन पलटी घेत नाशिक बाजूकडे जाणाऱ्या लेन मध्ये येऊन एका मालट्रकवर आदळली.

या अपघातात शिवणकर हे जागीच ठार झाले अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे अपघाताचे व्रुत्त समजताच ओझर पोलिसठाण्याचे पीएस आय बोरसे हवालदार रामदास घुमरे पोलिस नाईकस्वप्निल जाधव ,अमोल गांगोडे,प्रसाद सुर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन गँसकटरच्यासाह्याने कारचा पत्रा कट करुन शिवणकर यांचा म्रुतदेह बाहेर काढून शव विच्छेदनासाठी पिंपळगांव येथील रूग्णालयात पाठविला.

तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. याबाबत ओझर पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे अधिक तपास पोलिस नाईक स्वप्निल जाधव करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com