
नाशिक | Nashik
नाशिक-मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) इगतपुरीजवळील बोरटेंभे शिवारात बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू (Truck Driver Death) झाला आहे....
याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी येथील बोरटेंभे शिवारातील (Bortembhe Shivar) पोद्दार शाळेसमोर नादुरूस्त ट्रक क्रमांक (एमएच ०४ एफ.जे ३८०३) उभा होता. त्यावेळी नाशिकच्या दिशेने जाणारी खासगी ज्वेल फिश ट्रॅव्हल्सची बस क्र. (एमएच ४८ के ३७१८) ही थेट उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकली. त्यावेळी या भीषण अपघातात (Accident) एकाचा मृत्यू तर १२ जण जखमी झाले.
दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, बसची समोरील बाजू पूर्ण कापून गेली. तसेच घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पोलीस पथक आणि टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे चार तास ठप्प झाली होती. त्यानंतर स्थानिक महामार्ग सुरक्षा पोलीसांनी इगतपुरी शहरातून वाहतूक वळवून काही तासांत महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला.