कोटंबी घाटात पुन्हा अपघात; एकाचा मृत्यू

कोटंबी घाटात पुन्हा अपघात; एकाचा मृत्यू

पेठ | Peth

गुजरातहून नाशिककडे (Gujrat to Nashik) कोळसा वाहतुक (Coal transportation) करणाऱ्या ट्रकचा (truck) कोटंबी घाटात (Kotambi Ghat) अपघात (accident) झाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास गुजरातकडून नाशिककडे डी.डी.०१.ई.९८०१ या क्रमांकाचा ट्रक येत होता. हा ट्रक कोटंबी घाटात पलटी झाल्याने शिशूपालकुमार मिथीलेस प्रसाद (Shishupalkumar Mithiles Prasad) (वय २३) रा. ग्राम परियाग पो. फतेपूर अनमंडल, रजवदी जि. नवादा हे अपघातात जखमी झाले. त्यांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी पेठच्या ग्रामीण रुग्णालयात (Peth rural hospital) दाखल करण्यात आले असता उपचारावेळी त्याचा मृत्यू (death) झाला.

दरम्यान, या अपघातानंतर बराचवेळ वाहतुक विस्कळीत झाली होती. तसेच या घाटात वारंवार अपघात होत असून त्यावर कुठलीही ठोस उपाययोजना होत नसल्याने वाहन धारकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच या अपघाताची पेठ पोलीस ठाण्यात (Peth Police station) नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com