जुन्या भांडणाची कुरापत काढून एकास मारहाण

जुन्या भांडणाची कुरापत काढून एकास मारहाण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

हॉटेलमध्ये झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून एकास मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक विजयप्रकाश मिश्रा (Deepak Vijayprakash Mishra) (24 , रा. सह्याद्रीनगर, नवीन नाशिक ) हा त्याचा मित्र वैभव शिंगाडे (Vaibhav Shingade), अक्षय पाटील (Akshay Patil) व अन्य साथीदारांसह विल्होळी (Vilholi) येथील एका हॉटेलवर जेवणासाठी गेले होते.

त्यावेळी दीपक याने शिंगाडे यास जास्त दारू पिऊ नको असे सांगितले असता त्याचा त्याला राग येऊन त्याने दीपक यांचा जेवणाचा टेबल उलटा केला. यावरून दीपक व त्याचे सहकारी हॉटेल सोडून माघारी घरी परतले.

मात्र संभाजी स्टेडियम येथे दीपक फेरफटका मारत असताना वैभव, अक्षय व त्याच्या इतर सहकाऱ्यांनी हॉटेलमध्ये झालेल्या भांडणाची कुरापत काढून दिपकला लाकडी बॅट व स्टंपणे डोक्यात, पाठीत मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले.

दीपक यास त्याच्या मित्रांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वपोनी कुमार चौधरी (Kumar Chaudhary) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उत्तम सोनवणे (Uttam Sonawane) करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com