सिन्नर शहरात करोनाबाधित तरुणाचा मृत्यू
नाशिक

सिन्नर शहरात करोनाबाधित तरुणाचा मृत्यू

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

सिन्नर |प्रतिनिधी

सिन्नर शहरातील रेणुका नगर येथील ३१ वर्षीय युवकाचा आज(दि.१७) नासिक येथे उपचार सुरू असताना करोनाने मृत्यू झाला.

५ दिवसांपूर्वीच तो पत्नी व दोन मुलींसह मुंबईहून आईवडिलांकडे आलेला होता. तेथे दोन दिवसांनंतर त्रास होऊ लागल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात गेला होता. मात्र, त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला नाशिक येथे हलवण्यात आले होते.

आज सायंकाळी ७ च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाने मृत्यू झालेल्या तालुक्यातील रुग्णांची संख्या ९ झाली आहे. दरम्यान, आज विठ्ठलेश्र्वर मंदिराजवळ निघालेला २१ वर्षीय युवक हा चितळेश्र्वर मंदिराजवळ राहणारा आहे.

Deshdoot
www.deshdoot.com