बहिणीची छेड काढल्याच्या वादातून एकाचा खून

बहिणीची छेड काढल्याच्या वादातून एकाचा खून

नाशिक | Nashik

बहिणीची छेड काढल्याच्या वादातून बुधवार (दि.२२) रोजी निलगिरी बागेत राहणाऱ्या एका युवकाचा धारदार शस्त्राने वार (Sharp Weapon) करून खून (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे....

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद रोडवरील निलगिरी बाग (Nilgiri Bagh) येथे राहणारा विकास नलावडे (वय २५) हा संशयीताच्या बहिणीची नेहमी छेड काढत होता. यावरून संशयित साळवे व नलावडे यांच्यात यापूर्वी वाद देखील झाले होते. बुधवार (दि.२२) रोजी रात्री साडे नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान नलावडे याने संशयित साळवे यास निलगिरी बाग येथील बिल्डिंग न.५ जवळ असलेल्या पटांगणात भेटावयास बोलावले आणि मीच तुझ्या बहिणीसोबत लग्न करेल, असे सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

बहिणीची छेड काढल्याच्या वादातून एकाचा खून
भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी चीन हादरला

त्यानंतर संशयित अमोल साळवे (वय २७, रा.निलगिरी बाग, औरंगाबाद रोड) यास राग आल्याने त्याने विकासवर धारधार शस्त्राने वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला.त्यावेळी एका सुजाण नागरिकाने विकास यास लागलीच डॉ वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय (Hospital) येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. तसेच याप्रकरणी संशयित अमोल साळवे याच्यासह दोघांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.

बहिणीची छेड काढल्याच्या वादातून एकाचा खून
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे 'त्या' विधानावर स्पष्टीकरण; म्हणाले, अनावधानाने...

दरम्यान, ही कारवाई आडगाव पोलिस ठाण्याचे (Adgaon Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर,पोलिस उपनिरीक्षक अशोक पाथरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक भास्कर वाढवणे, पोलिस हवालदार सुरेश नरोडे,पोलिस नाईक गणेश देसले, निलेश काटकर,दादासाहेब वाघ,देवराज सुरंजे,पोलिस अंमलदार दिनेश गुंबाडे,सचिन बाहिकर,अमोल देशमुख, गणेश माळी यांनी बजावली.

बहिणीची छेड काढल्याच्या वादातून एकाचा खून
शेततळ्यात बुडून तरूणाचा मृत्यू
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com