सोन्याचे अमिष दाखवून ७५ लाखांना चुना; दोन ताब्यात

सोन्याचे अमिष दाखवून ७५ लाखांना चुना; दोन ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वस्तात सोने मिळवण्याचा प्रयत्न एकास खूप महागात पडला आहे. सोन्याचे अमिष दाखवून भामट्यांनी ७५ लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार शरद पवार फळ मार्केट व मखमलाबाद परिसरात घडला. याप्रकरणी शीघ्रगतीने तपास करत गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे...

मदन मोतीराम साळुंके व संतोष (रा. मातोरी, ता. नाशिक, पुर्ण नाव पत्ता नाही) असी फसवणूक करणार्‍या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी ईश्वर त्रिभुवन गुप्ता (४०, रा. विद्याभवन, आरटीओ कार्यालयाजवळ, पेठरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार काही दिवसांपूर्वी संशयित साळुंके व संतोष यांनी गुप्ता यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दोन किलोपेक्षा अधिक सोने असून ते उघडपणे बाजारात विक्री करता येत नाही. यामुळे सोन्याच्या चालू दराच्या तुलनेत ते खूप स्वस्तात देऊन पैसे मिळवायचे असल्याचे सांगितले.

यासाठी त्यांनी प्रत्यक्ष सोन्याचे काही खरे तुकडे गुप्ता यांना दाखवले. ते गुप्ता यांनी सोनाराकडून तपासून खरे असल्याची खात्री केल्यानंतर गुप्ता यांचा विश्वास त्यांनी संपादन केला. सोने घेण्यासाठी त्यांनी मखमलाबाद रस्त्याला गुप्ता यांना बोलावले.

त्या ठिकाणी सोने घेऊन एक व्यक्ती थांबली असल्याचे सांगितले. यासाठी पेठरोडवरील शरद पवार फळ मार्केट येथे 28 नंबरच्या गाळ्यातून ७५ लाख रूपयांची बॅग घेऊन ते गुप्ता यांच्यासह आडमार्गे मखमलाबाद रोडला घेऊन गेले.

त्यांना तेथे थांबण्यास सांगून सोने घेऊन येतो असे सांगून ते पसार झाले. गुप्ता यांनी त्यांना फोन करून पहिला परंतु त्यांच्याशी काहीच संपर्क न झाल्याने गुप्ता यांनी पोलिसांत धाव घेतली.

याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गुन्हे शाखा युनिट एकचे अधिकारी करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com