फोन पे करताय सावधान! नाशिकमध्ये एकाची झाली सव्वा लाखाची फसवणूक

फोन पे करताय सावधान! नाशिकमध्ये एकाची झाली सव्वा लाखाची फसवणूक

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

फोन पेच्या (phone pe) कस्टमर केअरमधून (Customer care) बोलतो आहे, असे सांगून एका जणाच्या दोन बँका खात्यातून सुमारे १ लाख 13 हजार 952 रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात (Upanagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

बद्री विशाल शुक्ला (Badri Shukla) (63 रा. पार्थ पूजा, रो हाऊस, हरिओमनगर, आर्टिलरी सेंटर रोड, नाशिकरोड) यांना त्यांच्या मोबाईलवर दीपक शर्मा (Deepak Sharma) नावाच्या युवकाने फोन करून सांगितले की मी फोन पेच्या कस्टमर केअरमधून बोलत आहे.

शर्मा नावाच्या युवकाने शुक्ला यांची फसवणूक करून त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यातून परस्पर 1 लाख 13 हजार 952 रुपये काढून फसवणूक केली.

ही घटना शुक्ला यांना समजताच त्यांनी संबंधित युवकाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे (Anil Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com