मनपाच्या कारवाईतून एक लाखांचा दंड वसूल

मनपाच्या कारवाईतून एक लाखांचा दंड वसूल

नवीन नाशिक | Nashik

विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर शनिवारी मनपाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतून सुमारे १ लाख ९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मनपाच्या नवीन नाशिक विभागीय कार्यालयाच्या वतीने पाथर्डी फाटा, नवीन नाशिक, पोलिस वसाहत या परिसरात विना मास्क फिरणाऱ्या १०९ नागरिकांकडून २१ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तर प्लास्टिक वापराबाबत ८ जणांवर कारवाई करून पाच हजार रुपये प्रमाणे ४० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या व्यवसायिकांवर ९ जणांवर कारवाई करून ४५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. असा एकुण १ लाख ९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मनपाच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. कारवाई प्रसंगी अतिरिक्त आयुक्त खाडे, विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे. यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाचे अधिकारी व सेवक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com