नाशिक । Nashik

बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी सुमारे दिड लाख रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री शिंदे गावातील तुंगार गल्ली येथे घडली.

याप्रकरणी बाळकृष्ण शंकर सोनवणे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याच चांदीचे दागिणे व रोकड असा 1 लाख 52 हजाराचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक भालेराव करत आहेत.