चौथ्या मजल्यावरून पडून पुन्हा मजुराचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

चौथ्या मजल्यावरून पडून पुन्हा मजुराचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बांधकाम करत असताना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मजुराचा (Labor) मृत्यू (Death) झाल्याची घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या (Adgaon Police Station) हद्दीत घडली....

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित नामदेव लाठे (Pandit Namdev Lathe) (५०, रा. भाभानगर, हिरावाडी, पंचवटी, नाशिक) हे कोणार्कनगर २, अक्षद निवास, गणेश मार्केट येथे एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर काम करत होते.

तोल जाऊन खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली. त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

Related Stories

No stories found.