देवळा : भीषण अपघातात एक जागीच ठार तर सहा जखमी

Accident
Accident

भऊर l Bhaur

देवळा येथील देवळा-सटाणा रस्त्यावर इसार पेट्रोलपंपाजवळ काल रविवार (ता.२७) रोजी रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान ट्रॅक्टर व अल्टो कार यांच्यात भीषण अपघात झाल्याने एकजण जागीच ठार तर इतर सहा व्यक्ती जखमी आहेत. हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरचे मोठे चाक निखळून पडले.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, काल रविवार (ता. २७) रोजी रात्री कांदा भरलेले ट्रॅक्टर (एमएच४१ एए ७२५६) हे सटाणाकडून येत होते तर अल्टोकार (एमएच ४१ एएस ६४६७) देवळ्याहून सटाणा जात असताना चालकाला अंदाज न आल्याने आहेरवस्ती नजीकच्या इसार पेट्रोल पंपाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

यात कारचालक सुभाष हनुमान देवरे (वय ४२) रा. गुंजाळनगर ता.देवळा याचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टरवरील शिवाजी गावीत, लक्ष्मण चौरे, धर्मराज कुवर (सर्व रा. भिलवाडा मांगीतुंगी, ता.सटाणा) तसेच गुंजाळनगर येथील रत्ना गुंजाळ, राधाबाई देवरे, सुनील गुंजाळ हे असे सहाजण जखमी असून त्यांच्यावर मालेगाव व नाशिक येथे उपचार सुरू आहेत.

या मार्गावर खड्डे असल्याने ते टाळण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com