नाशिक । Nashik

चांदवड आग्रा रोडवर चौफुलीवर पहाटे पाच वाजता एक लक्झरी बस उलटल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दरम्यान पहाटेच्या सुमारास मालेगाव कडून नाशिक कडे येणारी लक्झरी बस (जी जे १४ एक्स ४१०१) चांदवड चौफुलीजवळ उलटली.

यावेळी बाजूला उभ्या असलेल्या मारुती व्हॅनवर लक्झरी बस आदळल्याने त्या गाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाला. यात चांदवडचे डॉ. सुनील व्यवहारे यांचा मृत्यू झाला.