गॅस गिझरच्या स्फोटात एकाचा मृत्यू

गॅस गिझरच्या स्फोटात एकाचा मृत्यू

नाशिक | Nashik

घरातील गॅस गिझरचा स्फोट (Gas Geezer Blast) झाल्याने गंभीर जखमी (Major Injured) झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला...

सुरेश रामचंद्र काळे ( 52, फ्लॅट नंबर २२९ / २ अंबिका भवन, गणेश नगर, अमृतधाम जवळ, पंचवटी ) हे मयताचे नाव असून ( दि. 21 ) रोजी त्यांच्या राहत्या घरात गॅस गिझर चा स्फोट झाल्याने त्यांच्या मानेस ,हातास भाजून ते गंभीर जखमी झाले.

त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panachavti Police Station) नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस नाईक आर एन लिलके करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com