
सिन्नर | प्रतिनिधी Sinnar/ Nashik
सिन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात नागरिक जखमी झाल्याची घटना घडली. (one injured in leopard attack) जखमी नागरिकावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil hospital) उपचार सुरु आहेत...
सोमनाथ मर्थांड वाबळे, (रा-नायेगाव, ता. सिन्नर) असे या जखमी नागरिकाचे नाव आहे. आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दबा धरून बसलेल्या नागरिकावर बिबट्याने झडप घातली. (Leopard attack)यात सोमनाथ हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.
त्यांच्या मानेवर, हातावर व डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. स्थानिकांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने घटनास्थळावरून धूम ठोकली. यानंतर स्थानिकांनी तात्काळ वनविभागाला (Forest dept) याबाबतची माहिती दिली.
तसेच जखमीला तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात (civil hospital) दाखल करण्यात आले आहे.