म्हसरूळ गावात घरात घुसून बिबट्याचा हल्ला

म्हसरूळ गावात घरात घुसून बिबट्याचा हल्ला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात (Nashik City) पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) नागरिक जखमी (one injured) झाल्याची घटना घडली आहे. म्हसरूळ परिसरातील मोराडे वस्तीवर (Morade Vasti) मध्यरात्री आलेल्या बिबट्याने घरात शिरून झोपलेल्या व्यक्तीवर हल्ला केला. या घटनेत भारत बंडू यालकर (वय २९) जखमी झाला आहे....

जखमीवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. अधिक माहिती अशी की, म्हसरूळ (Mhasrul) परिसरातील वरवंडी रोडवर (Varwandi Road) असलेल्या मोरे मळा (More Mala) परिसरातील मोराडे वस्तीवर (Morade Vasti) भारत यालकर हे कुटुंबासह राहतात.

मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास गाढ झोपेत असताना अचानक बिबट्याने (Leopard) झोपलेल्या भारत यांच्यावर झडप घातली. यावेळी बिबट्याने त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर चावा घेतला.

यानंतर कुटुंबीयांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली. जखमी अवस्थेत असलेल्या भारत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी रुग्णालयात जखमी भारत यांच्या तब्बेतीचा आढावा घेतला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com