देवळाली कॅम्प : दोनवाडे येथे एकावर बिबट्याचा हल्ला

देवळाली कॅम्प : दोनवाडे येथे एकावर बिबट्याचा हल्ला

देवळाली कॅम्प | Deolali Camp

भगूर लगतच्या दोनवाडे गावात बिबट्याचा हल्यात इसम जखमी झाला आहे. जखमी इसमास तातडीनेभगूर येथे उपचारा साठी दाखल करण्यात आले.

दोनवाडे येथील संतोष शिवाजी सांगळे हे रात्री साडे आठ च्या सुमारास पप्पू शिरोळे यांच्या शेताशेजारील पाटाच्या रस्त्याने आपल्या मोटार साईकल वरून जात असताना पाटात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.

या हल्यात सांगळ याच्या पायावर मोठी जखम झाली. त्यांनी आरडाओरडा झाल्याने आजूबाजूला असलेले नागरिक धावुन गेले. त्यामुळे बिबट्या पसार झाला.

दरम्यान, जखमी संतोष सांगळे याना भगूर येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले,या भागात यापूर्वी देखील बिबट्या ने हल्ले केलेले आहेत,गत वर्षी एका बालकाचा बळी घेतला आहे.

त्यामुळे याठिकाणी तातडीने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com