कुरापत काढून एकावर चाकूने वार

पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल
कुरापत काढून एकावर चाकूने वार

इंदिरानगर | Indiranagar

आमच्याशी का बोलत नाही अशी कुरापत काढून एकावर चाकूने पोटावर वार करत जखमी केल्याची घटना पाथर्डी शिवारात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार (दि.१३) रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास प्रकाश देसले, पत्नी वृषाली देसले व मुलगी (रा. गणेश अपार्टमेंट पाथर्डी शिवार) हे रात्री सात वाजेच्या सुमारास फेरफटका मारत होते.

त्यावेळी संशयित आरोपी सागर चव्हाणके व त्याची पत्नी प्राजक्ता चव्हाणके दोघे त्या ठिकाणी येऊन तुम्ही आमच्याशी संबंध तोडून बोलणे का बंद केले असा जाब विचारत शिवीगाळ करत मारहाण केली.

यावेळी संशयित सागर चव्हाणके याने चाकूने प्रकाश देसले यांच्या पोटावर दोनदा वार करत गंभीर दुखापत केली तुमच्या सर्व कुटूंबाचा गेम करतो अशी धमकी दिली.

याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात चव्हाणके पती-पत्नीवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास व पो नि नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश जगदाळे तपास करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com