ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

इंदिरानगर | वार्ताहर

ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकी स्वराचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी परीसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालचंद्र शंकर कोंबडे (65 पाथर्डी गाव कोंबडे नगर ) रात्री पावणेसात वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्रमांक एम एच 15 बिबी 85 79 ) पाथर्डी गावाकडून कोंबडे मळ्याकडे चालले होते...

याच वेळी समोरून आलेल्या ट्रॅक्टरने कोंबडे यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास व पो नि निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतआहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com