नवीन नाशिक | प्रतिनिधी

दोन विषारी सापांच्या लढाईत एक साप जखमी झाल्याने मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. घोणस जातीचा विषारी साप व कोब्रा जातीचा नाग यांच्यात समोरासमोर सामना झाला...

स्वतःचे सामर्थ्य दाखवण्याच्या या प्रयत्नात नागाने घोणसला जखमी केले होते. ही लढाई सुरू असतानाच परिसरातील एक भटकी मांजर याठिकाणी येऊन तिने दोघांना हुसकावण्याचा प्रयत्न केला होता मात्र दोन्हीही सापांनी एकमेकांना सोडलेले नव्हते.

या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी प्राणीमित्रांच्या टीमला पाचारण केले. यावेळी ऋषिकेश कांबळे, अजय काकडे, कृष्णा शर्मा, अमेय धमखे यांनी घटनास्थळी पाचारण केले.

प्रथम कोब्रा जातीच्या नागाला पकडले. तर घोणस जातीच्या सापाला उपचारार्थ नेत असताना तो गतप्राण झाला.

यावेळी नागाची वनविभागाच्या कार्यालयात नोंद करून त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. हा दुर्मिळ प्रसंग प्रथमच बघितल्याचे सर्पमित्रांच्या टीमने सांगितले.