गोपाळवाडी येथे अपघात; एक ठार, तीन जखमी

गोपाळवाडी येथे अपघात; एक ठार, तीन जखमी
अपघात | Accident

येवला | प्रतिनिधी

तालुक्यातील नगर-मनमाड रस्त्यावरील गोपाळवाडी पाटी येथे हॉटेल हरियाणा मेवाड ढाबा समोर मनमाड कडुन येवल्याकडे येत असलेल्या छोटा हत्ती मालवाहतूक रिक्षाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एक ठार तर तीन जण किरकोळ जखमी झाले....

या अपघातानंतर रिक्षाने तीन पलट्या खाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात जाऊन पडली. यामध्ये प्रवास करणारे संजय राठोड वय ४६ यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या सोबत असलेली त्यांची पत्नी अनिता राठोड व चार वर्षाची मुलगी ग्रेसी राहणार मनमाड व सहप्रवासी इक्बाल अहमद इजाज अहमद सिद्दिकी राहणार मालेगाव हे किरकोळ जखमी आहेत. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

घटनास्थळी पोलीस हवालदार माधव सानप, पोलीस शिपाई गौतम मोरे आदींनी पंचनामा करून पुढील कार्यवाही केली. जखमींच्या व मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना बातमी कलताच जिल्हा आरोग्य केंद्रावर नातेवाईकांनी गर्दी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com