नांदगाव : टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नांदगाव : टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नांदगाव । Nandgoan

नांदगावकहून मनमाडकडे जाणाऱ्या दुचाकीला टँकरने जोरदार धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी मनमाड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मोटारसायकल नांदगावकहून मनमाडकडे जात असताना हिसवळ खुर्द जवळील कार्नरवर हा अपघात झाला.

यावेळी टँकरने ( एम.एच.26 ए.डी.2225) जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात जनार्दन सावळीराम वाघिरे (२२) रा.डॉक्टरवाडी ता.नांदगाव हा युवकांला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.

तर अंकुश भागिनाथ डोळे रा.जतपुरा ता.नांदगाव हा गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी मनमाड येथे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com