नाशिक-पेठ महामार्गावरील अपघातात दोन ठार दोन जखमी

नाशिक-पेठ महामार्गावरील अपघातात दोन ठार दोन जखमी

पेठ | Peth

नाशिक -पेठ महामार्गावर दोन मोटारसायकल ची समोर समोर धडक होऊन अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाले आहेत.

नाशिक-पेठ मार्गावर करंजाळी नजिक करंजाळीकडून नाशिककडे जाणारी बजाज डिस्कवर (एमएच १५ सीएक्स ३१४) व नाशिक कडून करंजाळीकडे येणारी होंडा शाईन (एमएच १५ सीझेड ९५५३) यांची रात्री ८ वाजे दरम्यान करंजाळी जवळील फॉरेस्ट नर्सरी नजीक समोरा समोर धडक होऊन त्यातील बाळू रामदास थाळकर (३२) रा .हेदपाडा ता. पेठ व युवराज मोतीराम बोंबले मयत झाला तर रामदास लक्ष्मण दरोडे हे गंभीर जखमी झाले.

रामदास दरोडे यांचे फिर्यादीवरुण अपघातास कारणीभूत ठरलेले युवराज बोंबले यांचे विरुद्ध पेठ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद होऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com