इगतपूरी : बिबट्याच्या हल्ल्यातील वृद्धाचा मृत्यू

कुरूंगवाडी येथील घटना
इगतपूरी : बिबट्याच्या हल्ल्यातील वृद्धाचा मृत्यू

नाशिक । Nashik

इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी बिबट्याच्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या वृधाचा उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला.

कान्हू चिमा धुपारे ( 75) असे या घटनेत मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. रविवारी (दि.11) रात्री कुरुंगवाडी भागात पहाटे चारच्या सुमारास पाड्यावर बाहेर ओसरीत झोपलेल्या जेष्ठवर बिबट्याने हल्ला केला होता.

त्यात धुपारे गंभीर जखमी झाले होते. बिबट्याने हल्ला करून त्यांना दूर झाडाखाली ओढून नेले होते घरातील इतर लोकांच्या पहाटे हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी त्यांना उचलून वस्तीवर आणले.

त्यानंतर जखमी सुपारे यांना उपचारासाठी त्वरित घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु त्यांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना आज त्यांचे निधन झाले

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com