कंटेनरवर कार धडकून एकाचा मृत्यू

कंटेनरवर कार धडकून एकाचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कंटेनरवर धडकून झालेल्या अपघातात (Accident) कारमधील एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात (Bhadrakali Police Station) कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार (दि.१३) ट्रॅक्टर हाऊससमोरील उड्डाणपुलावर रात्री नऊच्या सुमारास एन. एल. ०१ ए. ए. ९०३४ क्रमांकाचा कंटेनर धोकादायक पद्धतीने उभा केला होता.

त्याचवेळी रवींद्र शंकर मांडोळे (५१, रा. नवीन नाशिक ) हे त्यांचे भाऊ वसंत शंकर मांडोळे, देविदास मांडोळे, राजीव शंकर पाटील हे एमएच १५ एफएफ ९४५८ क्रमांकाच्या कारमधून पारोळा येथून नाशिकला येत होते.

कारचालक शंकर पाटील यांना अंधारामुळे उड्डाणपुलावर उभा असलेला कंटेनर न दिसल्याने कार कंटेनरवर जाऊन आदळली. या अपघातात वसंत शंकर मांडोळे यांचा मृत्यू झाला, तर इतर जखमी झाले. याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com