विंचूर जवळील घरफोडीत एकाचा मृत्यू

मध्यरात्री घडली घटना
विंचूर जवळील घरफोडीत एकाचा मृत्यू

विंचूर । Vinchur

विंचूर जवळील भरवस फाट्याजवळ पडलेल्या दरोड्यात कारभारी आबाजी जगताप यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची पत्नी अलका कारभारी जगताप या जखमी झाल्या आहेत. रात्री दीड ते दोनच्या सुमारास ही घटना घडली.

अधिक माहिती अशी कि, येवला रस्त्यालगतच जगताप यांचे घर आहे. तर त्यांची दोन्ही मुले मळ्यात राहतात. दरम्यान यातील एक मुलगा सकाळी उठवायला गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

जखमी अलका यांच्या जबाबानंतर सदर घटनेचा उलगडा होणार आहे. पोलीस घरफोडी की खून या दिशेने तपास करीत आहे. याप्रकरणी डीवायएसपी सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक रंगनाथ सानप, पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, यांसह पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com