शेजारच्याशी झालेल्या वादातून एकाचा मृत्यू

शेजारच्याशी झालेल्या वादातून एकाचा मृत्यू

नवीन | नाशिक प्रतिनिधी New Nashik

भाड्याने घेतलेली खोली Rented room खाली करत असताना शेजारच्याशी झालेल्या वादातून एकाचा मृत्यू झाल्याची घटना One died in an argument नवीन नाशकातील शिवशक्ती चौक येथे घडली. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल बाबुराव मगरे ( 32, रा. सरस्वती चौक शिवशक्ती चौक नवीन नाशिक ) राष्ट्रपाल बाबुराव मगरे (३३ ) हे घर मालक विनोद बागुल यांची भाडेतत्त्वावर घेतलेली खोली खाली करत असताना खोलीचा दरवाजाचा जोराने वाजवल्याने शेजारी राहणाऱ्या शालिनी तिवारी यांनी त्यांना जोरात आवाज करू नका असे म्हणून हटकले असता त्यांनी शालिनी यांना शिवी दिली.

यावरून त्यांचे पती जितेंद्र तिवारी (३५ ) यांनी शिवी का दिली? असे म्हणून विचारले असता संशयितांनी त्यांची कॉलर पकडून त्यांना जोरात पडल्याने ते घराच्या दरवाजा समोरील ढाप्यावर पडून त्यांच्या डोक्याला व तोंडाला मार लागून गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी निलेश राजपूत करीत आहेत.

Related Stories

No stories found.