टेम्पो दरीत कोसळून एक ठार; दोन जखमी

टेम्पो दरीत कोसळून एक ठार; दोन जखमी

सिन्नर | वार्ताहर | Sinnar

आडवाडी-सोनांबे रस्त्यावरील सोमेश्वर घाटात (Someshwar Ghat) एका वळणावर ब्रेक फेल झाल्याने दूध वाहतूक करणारा छोटा टेम्पो सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळून एक जण ठार झाला तर दोन जण जखमी झाले...

रविवारी सकाळी 9.30 च्या सुमारास हा अपघात घडला. महानुभाव पंथाचे कुमारमुनी गुरू नरेंद्रमुनी अंकुळनेरकर (76, मूळ रा. श्रीदेवदत्त महानुभाव आश्रम, वेरुळ लेणी, ह. मु. आडवाडी) यांचा या अपघातात (Accident) मृत्यू झाला असून विठ्ठल बिन्नर (55) यांच्यासह चालक जखमी झाला आहे. अंकुळनेरकर बाबा हे गेल्या 25 वर्षांपासून ठाणगाव-आडवाडी येथे राहत होते. अपघातानंतर चालक पोलिसांना (Police) आढळून आलेला नाही.

हा टेम्पो आडवाडी येथून सोनांबे रस्त्यावरील सोमेश्वर घाटाने सिन्नरकडे दूध वाहून नेत होता. या घाटात तीव्र उतार आहे. एका वळणावर ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व छोटा हत्ती थेट दीडशे फूट खोल दरीत कोसळला.

या मार्गावरून प्रवास करणार्‍या नागरिकांनी आडवाडी येथील पोलीस पाटील गुलाब बिन्नर यांना अपघाताची माहिती दिली. त्यांनी पोलिसांना खबर दिली. ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य करीत कुमारमुनी गुरू नरेंद्रमुनी अंकुळनेरकर, विठ्ठल बिन्नर यांना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. तिथे उपचारादरम्यान, अंकुळनेरकर यांचा मृत्यू झाला. बिन्नर यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com