मुसळधार पावसाने घराची भिंत कोसळली, एक ठार

मुसळधार पावसाने घराची भिंत कोसळली, एक ठार

चांदवड | Chandwad

चांदवड तालुक्यातील (Chandwad Taluka) पूर्व भागांमध्ये गेल्या 24 तासांपासून ढगफुटी सदृश्य पावसाने (Rain) ठिकठिकाणी पूर आला आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे...

अतिवृष्टीने चांदवड तालुक्यातील पिंपळद (Pimplad) येथील शेतकरी दिलीप गणपत माळी (Dilip Ganpat Mali) यांच्या अंगावर राहत्या घराची भिंत पडली. यात ते गंभीर जखमी झाले.

मुसळधार पावसाने घराची भिंत कोसळली, एक ठार
नाशिक तालुक्यात सरपंचपदासाठी 'यांनी' उधळला विजयाचा गुलाल, पाहा संपूर्ण निकाल

त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना रस्त्यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. दरम्यान, चांदवड तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसाने घराची भिंत कोसळली, एक ठार
उमराणेत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच दिवशी तीन ठिकाणी चोरी

चांदवड तालुक्यातील उसवाड, विटावे, भडाने, वागदर्डी, दहेगाव, डोणगाव, शिंगवे, निंबाळे, गंगावे, रायपूर, दहेगाव, कानडगाव, कुंदलगाव, निमोण, दरेगाव काजी सांगवी, दिघवद तसेच चांदवड शहरासह परिसरात 24 तासांपासून पाऊस सुरूच आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com