विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

म्हसरूळ (Mhasrul) परिसरात इलेक्ट्रिकचे काम करताना विजेचा धक्का (Electric shock) लागून एकाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे...

विजय नारायण धोंगडे (Vijay Narayan Dhongade) (47, रा. स्हेननगर, म्हसरूळ) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसरूळमधील गुलमोहरनगर (Gulmoharnagar), भाग्यलक्ष्मी अपार्टमेंट (Bhagyalakshmi Apartment) येथे धोंगडे हे इलेक्ट्रिक काम करत असताना त्यांच्या हाताचा पंजा व छातीला विजेची वायर लागून धक्का बसला.

यात गंभीर जखमी झालेल्या धोंगडे यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. परंतु तत्पुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे वैदयकीय अधिकार्‍यांनी घोषीत केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com