एकलहरे येथील डोंगरावरून पडून एकाचा मृत्यू

एकलहरे येथील डोंगरावरून पडून एकाचा मृत्यू
USER

नाशिक रोड | Nashik

एकलहरे परिसरात असलेल्या किर्लोस्कर येथील डोंगरावर फिरण्यासाठी गेलेला युवक पाच ते सहा फूट उंचीवरून पडल्याने गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याला उपचारासाठी नातेवाइकांनी रुग्णालयात दाखल केली असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

तुषार संजय डोबाडे १६ राहणार मोरे मळा बालाजीनगर जेल रोड नाशिक रोड हा युवक एकलहरे येथील किर्लोस्कर डोंगरावर फिरण्यासाठी गेला असता अचानक त्याचा तोल ढासळला.

पाच ते सहा फूट उंचीवरून खाली पडला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. दरम्यान ही घटना त्याच्या भावाला समजतात त्याने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास नाशिक रोड पोलिस करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com