नातवाला वाचवण्यासाठी गेलेल्या आजोबांचा मृत्यू

नातवाला वाचवण्यासाठी गेलेल्या आजोबांचा मृत्यू

येवला | प्रतिनिधी | Yeola

तालुक्यातील एरंडगाव बुद्रुक (Erandgaon Budruk) येथे नातवाला वाचवण्यासाठी गेलेल्या आजोबांचा विहिरीत तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा पडवळ (Krishna Padwal) हा खेळताना आडाजवळ गेला. तो आडात पडेल या भीतीपोटी त्याचे आजोबा रवींद्र पडवळ (Ravindra Padwal) यांनी तातडीने आडाच्या दिशेने धाव घेतली.

यावेळी अडाजवळून नातवाला बाजूला करत असताना रवींद्र पडवळ यांचा तोल विहिरीत जाऊन ते विहीरीच्या पाण्यात पडले व त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अरुण गंभीरे (Arun Gambhire) करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com