Nashik Accident News : मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी-कंटेनरचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू; ४ जखमी

Nashik Accident News : मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी-कंटेनरचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू; ४ जखमी

नाशिक | Nashik

काही दिवसांपूर्वी चांदवड तालुक्यातील (Chandwad Taluka) नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील नाशिक-चांदवड महामार्गावर कार व कंटेनर (Car and Containers) यांच्यात भीषण अपघात (A Terrible Accident) झाल्याची घटना घडली होती. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला होता. अशातच आता अपघाताची ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा चांदवड जवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड चौफुलीवर एसटी-कंटेनरचा भीषण अपघात झाला. यामध्ये बसच्या वाहकाचा जागीच मृत्यू झाला असून ४ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा मागचा भाग पूर्णपणे कापला गेला. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या अपघातानंतर जखमीना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच या अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर क्रेनने एसटी बस रस्त्यातून बाजूला करण्यात आली. तर सततच्या या रस्ते अपघातामुळे काहींना नाहक आपला जीव गमवावा लागत असून लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com