एक दिवसीय वारकरी संमेलन संपन्न

एक दिवसीय वारकरी संमेलन संपन्न

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

पंचवटीतील श्रीराम सार्वजनिक वाचनालय, संत ज्ञानेश्वर अभ्यासिका, माय माऊली भजनी मंडळ तथा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सीतामाई महिला वारकरी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय भव्य वारकरी स्नेहसंमेलन संपन्न झाले.

संमेलनाच्या अध्यक्षपदी जोग म. वा. शि. आळंदी संस्थेचे विश्वस्त त्र्यंबक गायकवाड होते. संमेलनाचे उद्घाटन जगद्गुरू द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी मनोहर शास्त्री सुकेणकर, दामोदर महाराज गावले, तुळशीराम महाराज गुट्टे, एकनाथ महाराज गोळेसर, रामनाथ महाराज शिलापूर, श्रावण महाराज अहिरे, धर्माचार्य निवृत्ती महाराज चव्हाण, नीलेश महाराज गाढवे, सोमनाथ घोटेकर, महेश महाराज अग्रवाल, भास्कर महाराज रसाळ, पुंडलिकराव थेटे, माणिकराव देशमुख, भरत आनंद सांगळे, भास्करराव तानपाठक उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व विठ्ठल रुक्मिणी पूजन, प्रतिमा पूजन करण्यात आले. सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान शब्दप्रभू गंगाधर महाराज कवडे यांचे हरिकीर्तन संपन्न झाले.यानंतर वारकरी गायक, गुणिजन तसेच दिंडी चालक-मालक यांच्या समस्या, शासकीय सुविधा जसे प्रवास सवलत, विमा शासकीय मानधन, निवृत्तीवेतन, आरोग्य वैद्यकीय उपचार यावर चर्चासत्र घेण्यात आले.

दुपारच्या सत्रात शहरातील वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम नियोजनातील अडचणी वारकरी, प्रवचन कीर्तनकार, कथाकार यांच्या समस्या प्रवासी सवलत व विमा शासकीय मानधन, निवृत्तीवेतन, वैद्यकीय उपचार सवलती, वारकरी निवास भवन याबाबत चर्चा करण्यात आली. डॉ. लहवितकर महाराज यांच्या उद्घाटनाच्या भाषणांच्या प्रतीचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी यशोदा अक्का जायखेडकर, डॉ. तुळशीराम गुट्टे, डॉ. रामकृष्ण लहवितकर,त्र्यंबक दादा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करत वारकरी संप्रदायाचे महत्त्व विशद केले.

याप्रसंगी वारकरी संप्रदायात उल्लेखनीय काम करणार्‍या यशोदा आक्का जायखेडकर, सुदाम महाराज काळे, निवृत्ती घोरवडकर, रेणुकाताई गायकवाड, कैलास देशमुख यांचा ’वारकरी भूषण’ पुरस्कार देऊन आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

आमदार श्रीकांत भारतीय यांनी मार्गदर्शन केले. संयोजक बाळासाहेब सानप यांनी मनोगत व्यक्त केले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी माजी नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, लक्ष्मण सावजी, गिरीश पालवे विजय साने अरुण पवार कमलेश बोडके सुनिता पिंगळे, नगरसेविका रंजना भानसी, मच्छिंद्र सानप, शामराव पिंपरकर, सुनील फरताळे, प्रवीण आहेर, दिगंबर धुमाळ, राहुल कुलकर्णी, सोमनाथ घोटेकर, रघुनाना थेटे, नवनाथ गांगुर्डे पंचवटी सह नाशिक शहरातील अनेक मान्यवर वारकरी उपस्थित होते. सुरेश महाराज मगर यांनी सूत्रसंचालन केले. मच्छिंद्र सानप यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com